
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगरपंचायत राळेगांव मध्ये प्रभाग क्रमांक बारा मध्ये विविध विकास कामां साठी तब्बल दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा विकास निधी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक बंधू उर्फ प्रदीप लोहकरे यांच्या सतत पाठपुरावा केल्यानंतर प्राप्त झाला आहे. या साठी वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे पुरविण्यात सी.ओ अरुण मोकळं यांनी मोलाचं सहकार्य केल्याने,प्रभाग क्रमांक बारा मधील बहुतांश विकास कामे त्वरित पूर्णत्वाकडे जाण्याचे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहे.
एक कोटी तेरा लाख रुपयांची कामे सुरु झाली असून,एक कोटी बेचाळीस लाख रुपयांचा विकास निधी,वर्मा हार्डवेअर ते क्रांती चौक हा संपूर्ण रस्ता सिमेंट रोड सह दुतर्फा पक्की नाली बांधकाम असा प्रस्तावित आहे याची निविदा झाली असून या महत्वपूर्ण कामाचा शुभारंभ याच महिन्याच्या अखेर होईल असे समजतं. विशेष म्हणजे एवढा मोठा विकास निधी खेचून आणण्यात “बंडू “चे योगदान आहे. प्रभाग क्रमांक बारा सह प्रभाग क्रमांक पाच मध्ये ही दलित वस्ती सुधार निधी प्राप्त झाला आहे. या प्रभागात बहुतांश ठीकाणी नाली बांधकाम सिमेंट रोड चा चांगले झाले आहेत.याच प्रभागात असलेल्या मोठ्या नाल्याच्या
पुराचे पाणी नागरिकांच्या घरात दरवर्षी घुसून नुकसान होत होते.याला पक्कं बांधकाम केल्या ने ही समस्या मार्गी लागली आहे. आपण निवडणूकी मध्ये दिलेल्या आश्वासनाची पुर्तता नगरसेवक बंडू उर्फ प्रदीप लोहकरे यांनी केल्या बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे हे विशेष….
