तीन अपक्ष उमेदवारांनी अनेकांना आणलं गोत्यात?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नुकत्याच संपन्न झालेल्या नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूकीत तीन अपक्ष उमेदवारांनी विजय श्री मिळविली,या मुळे अनेक दिग्गज गोत्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक सहा मध्ये दिलीपराव दुदगीरकर यांनी सुरुवाती पासून आघाडी घेत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक आठ मध्ये मंगेशभाऊ राऊत या अपक्ष उमेदवाराने भाजपा उमेदवाराला चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकून,काँग्रेस उमेदवाराला पराभूत करुन,आश्चर्याचा धक्का सर्व राजकीय नेतृत्वाला दिला आहे. प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये तर आदर्श मंडळाची अपक्ष उमेदवार सौ.पुष्पाताई विजय किन्नाके हिने मिळविलेला विजय सर्व राजकीय धुरंधरांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विजयी अपक्ष उमेदवारांनी काँग्रेस पक्षा कडे उमेदवारी मागितली होती. सर्वसामान्य मतदारांनी याची दखल घेत यांना थेट नगर पंचायत राळेगांव मध्ये निवडून पाठविले आहे.
या मधील मंगेशभाऊ राऊत हे साप्ताहिक आत्मबल चे संपादक,तर सौ पुष्पाताई विजय किन्नाके यांचे मागे आदर्श मंडळाचे सर्वेसर्वा साप्ताहिक राळेगांव समाचार चे संपादक फिरोझभाऊ लाखाणी व सर्व नवयुवकांनी सौ पुष्पाताई ला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आणून दाखवत,पत्रकार शक्ती चा प्रत्यय दाखविला आहे हे विशेष.