सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी अशोकराव भेडाळे यांचा कुंभा येथे सत्कार


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने माझे गाव कुंभा येथे जी. प. शाळा मध्ये झेंडा वंदन पार पडल्या नंतर सर्व शाळेतील विद्यार्थी, गावकरी, शिक्षकवृंद आणि मित्र परिवार यांच्या समवेत मी दिनांक 30 जुन 2022 रोजी पोलीस खात्यातून सेवा निवृत्त झाल्याने माझ्या कार्याची दखल घेऊन श्री अरविंद ठाकरे सरपंच ग्रामपंचायत कुंभा व मित्र परिवार यांनी माझा शालश्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. सत्कार ला उत्तर देताना मी या नंतरही गावकऱ्यांची सेवा करून लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे माझे कार्य मी अविरत सुरूच ठेवील असे आश्वासन सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी अशोकराव भेडाळे यांनी देवून पूर्वक मनोगत व्यक्त केले, माझ्या बद्दल व्यासपीठावर माझ्या कार्याची लोकांनी स्तुती केली त्यामुळे मी माझ्या नोकरीत चांगले कार्य केल्याचे मला समाधान लाभले, मला श्री अरविंदजी ठाकरे यांनी तीस हजार रुपये किमतीची हार्मोनियम सप्रेम भेटू देऊन मला पुढील कार्यास शुभेच्या प्रदान केल्या असेही अशोकराव भेडाळे यांनी आपल्या सत्कार प्रसंगी सांगितले