युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 

दिग्रस रमाईनगर येथील एका युवकाने घरातच मोठा रुमाल आड्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार , दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की, मृतक संघपाल वसंता कीर्तने (वय – ३१) रा.रमाईनगर ,दिग्रस हा घरात एकटा असतांना घरातील आड्याला मोठा रुमाल बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला लगेच दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी व २ मुले असा परिवार आहे.

मृतक संघपाल याने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही.या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हानंद टाले, बंडू तडसे करीत आहे.

     

1