आघात झालेल्या कुटुंबियांच्या दुःखावर सांत्वनाची फुंकर [ जळून मृत्यु झालेल्या शेतकरी कुटुंबाला आमदारांनी दिली भेट, शासकीय मदतीचे दिले निर्देश ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

 इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, 

मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते ‘
गावगाड्याची वीण विस्कटली, तशी माणसं मानसिक दृष्ट्या पोरंकीं झाली. स्वतः च सरण रचुन शेतकरी मरू लागल्याच्या घटना आपण पाहिल्या, वाचल्या ऐकल्या. आणि वरील ओळीतील आशयागत जगण्याच्या छळवनुकींतून मरणाने सुटका केल्याचा प्रत्यय येऊ लागला. गुजरी येथे एका शेतकऱ्याचा शेतात जळून दुर्देवी मृत्यू झाला. मात्र शासन व प्रशासन व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेची दखल घ्यायचे सौजन्य दाखविले नाही. दै. विदर्भ मतदार मध्ये वृत्त प्रकाशित होताच मात्र सारे खडबडून जागे झाले. स्थानिक आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय मदतीकरीता प्रशासनाला लगेच कारवाई करा असे निर्देश दिले. आमदारांनी माणुसकीचे दर्शन घडवित भेट दिली. मात्र प्रशासनाचे काय असा प्रश्न या निमित्ताने चव्हाट्यावर आला आला आहे. मरणातुन सुटका झाली पण मागे राहिलेल्याचे काय माय- बाप सरकार या कुटूंबावर झालेल्या आघाताची दखल घेईल काय या बद्दलही शाशँकताच वाटले.
गुजरी येथील लक्ष्मणराव भोंग वय वर्ष 82 या वृद्ध शेतकऱ्याचा शेतात जळून हनुमान जयंती च्या दिवशी मृत्यू झाला. मक्त्याने केलेल्या शेतातील गव्हाची खेवल पेटवत असतांना अनावधानाने ठिणगी अंगावर उडाली आणि घात झाला. भर दुपारची ऊन व हवा या मुळे आगीच्या लपटा तीव्र होतं गेल्या आणि जाग्यावरच या शेतकऱ्याला शेतातच मरण आले. तब्बल आठ दिवस उलटून गेलें तरी कुणीही या गँभीर प्रकाराची दखल घेतली नाही. साधे भेट देऊन सांत्वन करण्याचे सौजन्य शासन -प्रशासनाने दाखवले नाही. विदर्भ मतदार मध्ये दि. 25 एप्रिल च्या अंकात ‘ शेतात जळून शेतकऱ्याचा मृत्यू ( सांत्वनाच्या सौजन्य|चा लोकप्रतिनिधीना विसर ) या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले आणि काल आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर आदींनी प्रत्यक्ष गुजरी येथे घरी जाऊन या कुटुंबाचे सांत्वन केले. विभागाचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी तेथूनच अधिकाऱ्यांना खडसावून या मृत्यु चा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आकास्मित मदत मिळण्याकरिता स्वतः प्रयत्न करणारं असे आस्वस्त करणारे उदगार काढून कुटुंबाला धीर दिला. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. गेलेला वेक्ती परत येतं नाही मात्र या वेळी कुटुंबीयांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. स्थानिक आमदार यांचे सह पदाधिकारी यांनी भेट दिल्याने दुःख|वर निदान फुंकर घातल्यागेली.
लक्षणराव भोंग हे गावातील अत्यंत सभ्य गृहस्थ म्हणून सुपरिचित होते. सतत काहीतरी कामं करत राहण्याची सवय असणारे हे वृद्ध वेक्तीमत्व काळाच्या आड गेल्याने सर्वत्र हळहळ वेक्त होतं आहे.