आत्महत्या केलेल्या युवकाचा कुटुंबियाना मदत मिळण्याकरिता कंपनी प्रशासनासोबत शेतकऱ्यांची बैठक

:– मुकुटबन येथील शेतकऱ्यांच्या शेती कवडीमोल भावात खरेदी करून शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीत नौकरी देण्याचे आस्वासन देऊन एकाही मुलाला नौकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ३० डिसेंबर पासून धरणे व नंतर आमरण उपोषण केले. उपोषण दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकरी गिरीश परसावार याने गावात स्थित असलेली एम पी बिर्ला सिमेंट कंपनीत नौकरी देत नसल्यामुळे तसेच इतर करणे लिहून माझ्या मृत्यूला सिमेंट कंपनी जबाबदार असल्याचे लिहून आत्महत्या केली होती.

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी कंपणीच्या संमधीत अधिकार्याविरुद्ध मरण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अंतर्गत गुन्ह दाखल करण्याची मागणी सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन करण्यात आली होती.

तसेच उपोषण दरम्यान कंपनी व आंदोलक दरम्यान अनेकदा बैठकी घेण्यात आल्या परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंवणीच्या मुख्य द्वार बंद करण्यात आले. कंपणीचा मुख्य गेट बंद करताच कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आली. व अखेर तहसीलदार गिरीश जोशी ठाणेदार अजित जाधव कंपनीचे हेड अभिजित दत्ता, जयंत व्यास, पंत तसेच प्रकल्पग्रस्त शेकऱ्यातर्फे वासुदेव विधाते,प्रदीप टोंगे,गणेश आसुटकर,दत्तात्रय चिंतावार सह इतर शेतकऱ्याच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये मिटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या एम.पी बिर्ला कंपणीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्याच अनुषंगाने २८ जानेवारीला दुपारी कंपणीचे एच आर जयंत व्यास यांच्या सोबत मृत शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रमुख म्हणून वासुदेव विधाते दत्तात्रय चिंतावार,मनोज आकीणवार मृतक शेतकऱ्यांचा भाऊ राकेश परसावार उऑस्स्थित होते चर्चेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना त्वरित मदत करण्याची मागणी केली. कंपनी प्रशासनाकडून सहा दिवसाची मुदत मागण्यात आली आहे अशी माहिती वासुदेव विधाते यांनी दिली. कंपनीने मदत न केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंपणीविरुद्ध दिलेल्या पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.