भारतीय शेतकरी युनियन चे अध्यक्ष राजेश टीकैत यांची यवतमाळ मध्ये जाहीर सभा

देशभर आंदोलन पोहचविण्यासाठी सुरुवात यवतमाळ मधून

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,यवतमाळ

केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या तिन्ही कायद्याविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.दिल्ली च्या सीमेवर देशभरातील शेतकरी ठाण मांडून बसलेले असताना देखील केंद्र सरकारला घाम फुटत नसल्याने हे आंदोलन देशभर पेटविण्याची तयारी भारतीय किसन युनियन कडून केल्या जात आहे .या सभेच्या आयोजनाची माहिती सिकंदर शहा यांनी दिली आहे.दिनांक 20 फेब्रुवारी 2021 ला ही सभा स्थानिक आझाद मैदान येथे घेणार असल्याचे सांगितले आहे.
या कृषी कायद्यानुसार किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. या नवीन कायद्याच्या माध्यमातून शेतीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे .करार शेतीमुळे गरीब शेतकरी आणखी हतबल होऊन गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार काल 20 तारखेला होणाऱ्या संभेच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली त्यात याच जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांची संदर्भात संयुक्त किसन मोर्चाचे संयोजक श्रीकांत तराळ यांच्या अध्यक्षतेखाली ची बैठक झाली असून शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा व स्वामिनी दारूबंदी संघटनेचे महेश पवार व जिल्ह्य़ातील विविध संघटनांचे शेतकरी नेते व पदाधिकारी उपस्थित होतेशेतकरी नेते उपस्थित होते.