सर्वोदय संकल्प पदयात्रा राळेगाव शहरात दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राजीव गांधी पंचायतराज संघटनच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीनाक्षी नटराजन यांच्या नेतृत्त्वात आणि हर्षवर्धन सपकाळ, सचिन नाईक, संजय ठाकरे यांच्या सहभागात १४ मार्चपासून ही पदयात्रा मार्गक्रमण करत आहे. राळेगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजता राजीव गांधी महाविद्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात्रा परिसरात दाखल झाल्यानंतर माजी मंत्री प्रा.वसंतरावजी पुरके, कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव सभापती प्रफुल भाऊ मानकर, अरविंद भाऊ वाढोणकर यांच्यासह अनेकांनी स्वागत केले. मार्गात ठिकठिकाणीही या यात्रेचे स्वागत झाले.

आश्रमशाळेला भेट

डोंगरखर्डा : अंतरगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला पदयात्रेतील मंडळींनी भेट दिली. यामध्ये सर्वोदय पदयात्रेचे संयोजक विजय दिवाण, माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांचा समावेश होता. यावेळी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतरावजी पुरके साहेब, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव सभापती प्रफुलभाऊ मानकर, अरविंद भाऊ वाढोणकर, प्रा. बी.आर. माडगुळकर, राहुल ठाकरे, अॅड. सचिन नाईक आदी उपस्थित होते. त्यांचे स्वागत करण्यात आले. आभार मुख्याध्यापक विजय क्षीरसागर यांनी मानले.