
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
साक्षगंध झालेल्या महीला पोलीस महिला शिपाईने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महीला पोलीस शिपाई मिनाक्षी शंकर मेश्राम (३०) रा. सुरज नगर हिचा काही दिवसापूर्वीच एका मुलाशी साक्षगंध सोहळा पार पडला होता दरम्यान तिथे लग्नही उरले होते मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापुर्वीच मिनाक्षी हिने आपल्या सुरज नगर येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत अवधूत वाडी पोलीस ठाण्यातील पोलीसांना माहीती दिली असता पोलीसांनी घटनास्थळ गान मिनाक्षी हिव्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
