फिरत्या रथाला उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरुवात

राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)


खरीप हंगामातील पिकात वाढलेले तण आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी तणनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करतात तेव्हा फवारणी करताना घ्यावयाची काळजी याकरिता जनजागृती करणाऱ्या रथाला दिं ९ जुलै २०२१ रोज शुक्रवारला उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरवात करण्यात आली.
शेतकऱ्यांनी फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत तालुका कृषी विभाग व एनजीओ च्या वतीने जनजागृती करणाऱ्या फिरत्या रथाचे आयोजन करण्यात आले होते याकरिता प्रशासकीय इमारतीचा प्रांगणातून फिरत्या रथाला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली असून यावेळी उपस्थित तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे,कृषी अधिकारी मनीषा गवळी,मंडळ अधिकारी धुमाळे,अमोल भैसवार (आत्मा) कीन्ही येथील सरपंच सुधीरभाऊ जवादे,आधी मान्यवर उपस्थित होते.