सुमित राठोड , निखील चव्हाण राष्ट्रीय गौरव पुरस्कारने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यातील माहुली येथील पक्षीप्रेमी वृक्षप्रेमी असलेले दोन्ही जीवलग पर्यावरणप्रेमी मित्र सुमित राठोड व निखील चल्हाण यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती व पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था ,भारत यांच्या कडुन राष्ट्रीय गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे सुमित नागपूर राखीव पोलीस बलात कार्यरत असुन आपले खंडतर कर्तव्य करुन तर निखील एमपीएसीची तयारी करुन मागील तीन वर्षा पासुन शुभेच्यारुपी एक वृक्षरोपण हा उपक्रम राबवत आहे तसेच वृक्षभेट सिड्सबाँल तयार करुन वाटप करणे व वृक्षा विषयी कार्यशाळा आयोजन करणे पक्षी साठी घर व अन्नपाणोई जनजागृती करिता कविता वाढदिवस साजरा न करता गरजुना भेट वस्तु देणे रजेवर गेले तर गावातील मुलाना प्रशिक्षण देणे तसेच जमेल ती समाजसेवा असे बरेच कार्य ते करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोसत्व समिती चे अध्यक्ष आदरणीय श्री उमाजी बिसेन तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत चे अध्यक्ष आदरणीय श्री देवा तांबे सर यांनी सुमित राठोड व निखील चव्हाण यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे कार्याची दखल घेतल्या बद्दल सुमित राठोड यांनी आदरणीय उमाजी बिसेन सर व देवा तांबे सराचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.