
उपकार्यकारी अभियंता राळेगाव यांचे वडकी वीज वितरण कंपनी कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी सीताराम चंटी आडे गट नंबर २१/२ शेती तीन एकर हा शेतकरी अल्पभूधारक असुन मात्र सात वर्षांपासून वडकी वीज महावितरण कंपनीने लाईट पासून वंचित ठेवले आहे.सविस्तर वृत्त असे सदर शेतकरी हा आदिवासी असुन अल्पभूधारक आहे. यांनी २० ऑगस्ट २०१५ मध्ये आपले शेत ओलिताखाली यावे म्हणून उसनवारी पैसे काढून शेतात लाईट यावे म्हणून ५२०० रुपये डिमांड भरले होते या शेतकऱ्यांनी वडकी वीज पुरवठा कंपनी कडे वेळोवेळी चक्रा मारुन सुद्धा संबंधित अधिकारी हे उडवाउडवीची उत्तर देत होते असे मत शेतकरी सीताराम आडे यांनी व्यक्त केले आहे सदर ८ ते ९ महिन्यापूर्वी सहाय्यक अभियंता जे.एस.ढुमणे यांची बदली राळेगाव येथे झाली आहे. त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले सहाय्यक अभियंता पवन गीरी हे रुजू झाले आहे. परंतु गीरी सहाय्यक अभियंता वडकी यांच्या कामावर रिधोरा परिसरातील संपूर्ण शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे. सदर १३ एप्रिल पासून तर आजपर्यंत रिधोरा ते खैरगाव जवादे रोडच्या बाजूने गेलेली लाईन पुर्णपणे तुटून पडली आहे परंतु अजुनपर्यंत ही लाईट जोडल्या गेली नाही.यामुळे या परिसरातील पाण्याअभावी पीके जळून खाक झाली आहे. तरी उपकार्यकारी अभियंता राळेगाव व वडकी सहाय्यक अभियंता गीरी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे रिधोरा परिसरातील बरेच शेतकरी शेतातील डिमांड भरून सुद्धा लाईट पासून वंचित असल्याचे शेतकरी सिताराम आडे यांनी सांगितले आहे.
