जय शिवराय मित्र मंडळ ,दिघी क्र १ च्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल चे क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जय शिवराय मित्र मंडळ ,दिघी क्र १ च्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल चे क्रिकेट सामन्यांच्या उद् घाटन समारंभ दि.७-३-२०२२ रोजी राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा . वसंतरावजी पुरके यांच्या शुभहस्ते अध्यक्ष श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ श्री.शैलेशभाऊ गुल्हाने,जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र किसान काॅग्रेस श्री.मनमोहनजी भोयर , बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती श्री .महेन्द्रजी घुरडे,बाभुळगाव तालुका महिला काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तथा संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव सौ.प्रितीताई अविनाशजी वानखडे,माजी सरपंच भटमार्ग रतनभाऊ इंगळे , माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वासुदेवजी शिंदे,अविनाशजी वानखडे,संजयभाऊ गावंडे,संजयराव चौधरी,गजाननजी बगाडे,दशरथजी हेलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी शैलेशजी गुल्हाने,मनमोहनजी भोयर ,प्रा.वसंत पुरके यांनी युवकांना मार्गदर्शन केले.सामने यशस्वी करण्यासाठी राहूलभाऊ देशमुख,यशभाऊ बागडे,मनिषभाऊ बागडे ,सुरजजी झीटे,शक्ती सोनवणे,चेतन भुसारी,आदीत्य हेलोंडे,अक्षय डगवाल, प्रशांत पुनसे, गोपाल शेंदरे,अनिकेत नाकतोडे,दिपक गावंडे,सारंग देशमुख,संकेत पुनसे,संकेत बागडे,मयुर बागडे,प्रितम घरत , शाहरुख शाह , गोपाल भुसारी , अभिषेक हेलोंडे यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.