
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
२२व२३तारखेला झालेल्या धुवांधार पावसाने माड पट्ट्यातील सोयाबीन चे मोठं नुकसान झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांना प्रशासनाने,प्रत्यक्ष पाहणी करुन ,पंचनामे करावे ,आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती राळेगांव चे सभापती प्रशांतभाऊ तायडे यांनी केली आहे.
बावीस तारखेला रात्री पडलेला पाऊस म्हणजे ढगफूटी प्रमाणे होता तर तेवीस तारखेला सतत चार ते पाच तास पावसाने तुफानी बॅटींग करुन सोयाबीन चा पार सत्यानाश करुन टाकला आहे. याच सोबत पऱ्हाटीचे बोंडे काळी पडून सडण्यास ,गळण्यास सुरुवात झाली आहे. या प्रभागाचा पाहणी दौरा सभापती प्रशांतभाऊ तायडे यांनी केल्यानंतर शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झाल्याचे दिसले.
वरुड जहांगीर,सराटी,बोराटी,वरध,सावरखेडा सह आजूबाजूच्या शेतशिवारातील पीक मुसळधार पावसाने खराब झाले आहेत.
