राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथे झलके परिवाराचे वडील स्वर्गीय जनार्दन राव झलके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस टी आय सध्या मुंबई येथे कर्यायात असलेले किशोरभाऊ झळके यांच्यावतीने पिंपळखुटी येथील जिल्हा परिषद शाळेततुन प्रथम, द्वितीय, व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी प्रथम पारितोषिक 501, दितीय 401 व तृतीय 301 ही रक्कम दरवर्षी वाढत जाणार आहे,तसेच किशोर झळके
यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे,त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यास ते ग्रामीण भागातून आपले नाव उज्वल करीत यशस्वी होतील असा उदांत हेतू मनाशी बाळगून असे मनोगत श्री किशोर भाऊ झलके केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील नुकत्याच झालेल्या वार्षिक निकालात येत्या सातवी मधील गायत्री मरस्कोल्हे, वैष्णवी रहाटे, प्राची डोमकावळे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन च्या पदाधिकारी तर्फे गौरव करण्यात आला, किशोर झलके आणि गावातील मुलांसाठी सुरू केलेला उपक्रम हा मुलांच्या आयुष्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे असे प्रतिपादन गावातील लोकांनी या गुणगौरव कार्यक्रमात व्यक्त केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तुमराम सर व सोनेकर सर व इतर सर्व शिक्षक वृंद हजर होते.