केंद्रातील मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासाचा मार्ग प्रशस्त केला – आ.प्रा. डॉ अशोक उईके

. राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर(9529256225).

केंद्रातील मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, इथे सर्वांना न्याय मिळतो. त्या मुळेच देशातील जनतेने पुन्हा एकदा बहुमताने हे सरकार निवडले आहे. आज सलग सात वर्ष मा. पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या सरकारला झाले. ही विकास यात्रा आहे. सर्वसमावेशक विकासाचा मार्ग या मुळे अधिक प्रशस्त होतांना दिसतो, असे प्रतिपादन आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वातील सरकारला सात वर्षं पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने राळेगांव तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने रक्त दान शिबीर व कोरोना योध्याचा सत्कार व सन्मान कार्यक्रमात काढले .भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासात्मक दृष्टीकोन ठेवून पूढे नेले त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला सात वर्ष यशस्वीपणे पूर्ण होत आहे. कोव्हिड 19 च्या महामारी चे संकट देशावर असताना समर्थपणे या संकटाचा सामना केंद्र सरकारने केला आहे असे प्रा डॉआमदार अशोक उईके म्हणाले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चितरंजन कोल्हे उपस्थित होते प स सभापती प्रशांत तायडे शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर माजी नगराध्यक्ष बबनराव भोगांरे ज्येष्ठ नेते मोहन गुंदेचा डॉ प्रकाश चिमनाणी डॉ भीमराव कोकरे माजी आरोग्य सभापती नगरपंचायत अरुण शिवणकर उपस्थित होते. कोरोना काळामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केले अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला यानंतर रक्तदान शिबिराला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब दिघडे यांनी केले .तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार व आरोग्य कर्मचारी यांचेही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला नियोजित कार्यक्रमानुसार वडकी पोलिस स्टेशन चे ठाणेदार विनायक जाधव व पोलीस कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी सन्मान पत्र देऊन सन्मान केला, खैरी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांचा सुद्धा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. यानंतर आष्टोना या गावाला भेट देऊन आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांचाही सन्मान करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव या ठिकाणी जाऊन आमदार अशोक उईके यांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला . कोरोना महामारी च्या काळात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवा केली शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वर अंकुश ठेवला असा पोलीस विभाग ,आरोग्य विभाग, पत्रकार, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचा सन्मान केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करतांना लोक प्रति निधी म्हणून मला समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी व्यक्त केली संपूर्ण कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य चितरंजन कोल्हे सभापती प्रशांत तायडे डॉ डॉक्टर कुणाल भोयर डॉक्टर अक्षय जव्हेरी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ भीमराव कोकरे विनायक महाजन संदीप तेलंगे अरुण शिवणकर शुभम मुके संजय इंगळे चेतन वर्मा अभिजित कदम यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले .