राळेगांव शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पन्नास खुर्च्या कोवीड सेंटर ला सस्नेह भेट


राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर


समाजा प्रती आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीचं काँग्रेस पक्ष सदैव कटीबध्द आहे याच अनुषंगाने प्रेरित होऊन राळेगांव शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने कोवीड सेंटर राळेगांव ला पन्नास खुर्ची सस्नेह भेट देण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.यावेळी तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे,तालुका आरोग्य अधिकारी डाँक्टर गोपाळ पाटील,नगर पंचायत राळेगांव चे राहूल मारकड,नायब तहसीलदार दिलिप बदकी,ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानराव गीरी,शहर अध्यक्ष प्रदिप ठूणे,राजाभाऊ दुधपोळे,भानुदास राऊत,प्रदीप लोहकरे,अफसरअली,सतीश डाखोरे,गजानन पाल,आकाश ताठे,सह तलाठी मोहन सरतापे,सह अन्य मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस कमिटी राळेगांव चे वतीने कोरोणा महामारी विषयी जनजागृती अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आले.पंधरा हजार पत्रकं वाटण्यात आली.ऑटो द्वारे काळजी घेऊया कोरोणा पासून दूर राहूया, नियम पाळून आपला बचाव करुया असा संदेश दिला आहे….