
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी पकडून ३२ गोवंशांची सुटका केली. ही कारवाई वडकी पोलिसांनी रविवार, दि. ५ डिसेंबरला करण्यात आली असून जवळपास २५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून वडकी मार्गाने गोवंश कत्तली करीता निर्दयीपणे कोंबून अदिलाबादकडे जात असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील एका ढाव्यासमोर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी क्रमांक एमएच-४०-बीएल-८४९२ यांच्या चालकाचा पोलिस वाहनांची तपासणी करीत असल्याचा संशय आला. दरम्यान ट्रक चालक आणि त्याचा एक साथीदार दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी टकची तपासणी केली असता, त्या ट्रकमध्ये ३२ गोवंश निर्दयीपणे कोंबून आढळून आले. या प्रकरणी वडकी पोलिसांनी ट्रक आणि गोवंश असा एकूण २४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनायक जाधव साहेब, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भोंगाडे यांच्या अरुन भोयर, अशोक भेंडाळे ,विकास धडसे,गजानन अडपावार,विजय बसेशंकर ,आकाश कुदुसे,विलास जाधव ,विकेश ध्यावतेवार,किरण दासरवार,संदीप मडावी,अरविंद चव्हाण यांनी पार पाडली.
