राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे घरपोच लसीकरण सेवा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)

दि.26/11/2021 रोज शुक्रवार ला रात्री कोविड चे घरपोच लसीकरण मोहीम देण्यात आले.पहिल्या डोस चे 8 व दुसऱ्या डोस चे 33 असे एकूण 41 लोकांचे लसीकरण झाले.तेव्हा ग्रामपंचायत धानोरा उपसरपंच श्री. विशाल येनोरकर ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रमोद घोडे ,ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडे व इतर ग्रा.प. सदस्य हजर होते तसेच गावातील नागरिक प्रीतम घिनमीने,अक्षय घोडे,निलेश वरघणे,हर्षल घोडे ,योगेश घोडे,आशिष उराडे,जीवन पुणेकर ग्रा.प.कर्मचारी राजुजी नेहारे लस देण्याकरिता नर्स रजनीताई कदम ,ऑनलाईन साठी आकाश खेडेकर,आशा वर्कर लताताई पोटभरे, मंजुषाताई खेडेकर,सीताताई नेहारे हजर होते..