
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मागील जुलै महिनात पावसाने धो धो सुरवात केली असून धो धो बरसलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी संकटाचा महिना ठरला असून शेतातील झालेल्या नुकसानीची अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतातील पाणी हटेना सरकारच्या मनाला पाझर फुटेना अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
मागील जुलै महिन्या दिं ९ तारखेला तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस आल्याने व १७ व १८ जुलै रोजी आलेल्या अति मुसळधार पावसाने तालुक्यातील ३० हजार हेक्टर वरील पिके वाहून गेली शेती हंगामच वाहून गेला असल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर पडला आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या याबाबत शासनाने संबधीत विभागाला थेट शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले संबधीत विभागाने शेतातील पंचनामे सुद्धा पूर्ण झाले असले तरी अजून शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी पडली नाही त्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्याचे अवसानही नाही.
सतत महिनाभर पडणाऱ्या पावसाने अवघे चार ते पाच दिवसाची उघडदीप दिली तोच पुन्हा जोर धरल्याने शेतातील पाणी हटेना पण सरकारच्या मनाला पाझर फुटेना असे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारने सरसकट मदत ताबडतोब द्यायला हवी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बोलून दाखविला तालुक्यात बऱ्याच गावातील चिबड बनलेली शेती पिवळी पडलेली पिके पुराने खरडलेली शेती जमीन आणि हताश शेतकरी असे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक गावातील शेती अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहे प्रशासनातील अधिकारी पंचनामे केलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगनघाट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावात भेट देवून झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला तसेच माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा राळेगांव येथे येवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्याच प्रमाणे आजी माजी लोकप्रतिनिधींची दौरे झालेत पण नुसतेच फोटोसेशन ठरले नाहीत ना आमचे दुःख अद्याप सरकार दरबारी पोहोचले नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारला पाझर केव्हा फुटतो याची प्रतीक्षा याची असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.
