
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव महसूल विभागाचे तलाठी हे हलक्यावर न जाता राळेगाव येथे प्रस्थ ईमारती मधुन कारभार पाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे कामे सोडुन सात बारा व विवीध कामाच्या कागदपत्रांसाठी राळेगावला यावे लागत वेळे सोबत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. तलाठी हे हलक्यावर एकही दिवस जातांना दिसत नाही संध्या शाळा, महाविद्यालय हे सुरू झाले विद्यार्थ्यांना शाळेच्या कामासाठी काही कागदपत्रे हे तलाठ्या कडूनच घ्या लागते पण ते वेळेवर मिळत नाही तलाठ्यांना फोन केला असता राळेगाव ला या आम्ही राळेगावात आहे असे सांगितले जातात काही तलाठ्यांनी यांनी चुकीचे नंबर सुद्धा दिंले आहे फोन करून फोन लागत नाही आऊट ऑफ कव्हरेज सांगीतले जातात या गोष्टिपासुन सुद्धा शेतकरी हतबल झाले आहे . विशेष म्हणजे तुम्ही आज का आले उद्या यायच होत फोन करून असा दम सुद्धा दिंला जातो.अनेक शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली आहे व याबाबत तहसिलदार यांनी तलाठी यांनी हलक्यावर जाण्याचे आदेश दिले होते व तेव्हा काही दिवस तलाठी हलक्यावर गेले होते परंतु आता पुन्हा तलाठी हे राळेगाव मधून कारभार पाहत आहे. तहसीलदार यांच्या आदेशाला गुंगारा देत या तलाठ्यांनी राळेगाव येथे अलीशान बंगले भाड्याने करून कारभार चालवत आहे शेतकरी यांना गरज असेल तर तुमचे शेतीचे कामे टाकुन आर्थिक भुर्दंड सोसुन आमच्या ठिकाणी या तुम्हाला गरज असेल तर असे एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले अनेक गावांत तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे परंतु त्याठिकाणी तलाठी राहत नाही हे विशेष…. शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास हा तलाठी हलक्यावर न गेल्याने होत आहे त्यामुळे त्वरीत तलाठी यांना हलक्यावर जाण्याचे आदेश तहसिलदार यांनी द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
आता राळेगाव तहसीलदार शेतकरी हिताचा निर्णय घेनार का कर्मचारी यांच्याकडून निर्णय देनार या गोष्टिकडे राळेगाव तालुक्यातील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे.
