काँग्रेस बद्दल विवादित व्यक्तव्य,पंतप्रधानांचा जाहीर तीव्र निषेध

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कोरोणा महामारी विषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बद्दल संसदेत विवादित व्यक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहिर तिव्र निषेध राळेगांव तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात तहसिलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांना निवेदन दिले आहे.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष अरविंद वाढोणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ता मंडळी सह तहसिल कार्यालयावर धडकून,आपला रोष व्यक्त केला आहे.
यावेळी नरेंद्र ठाकरे, ॲड.प्रफुल्ल मानकर, तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे.शहर अध्यक्ष प्रदीप ठूणे,जिल्हा सरचिटणीस जानराव गीरी,अफसरअली सैय्यद,गजानन पाल,प्रदीप लोहकरे,राजेंद्र तेलंगे,मधुकर राजूरकर, शशांक केंढे सह काँग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका सह अन्य मान्यवर उपस्थित होते.