राळेगाव नगराध्यक्ष पदी रविंद्रभाऊ शेराम तर उपनगराध्यक्ष पदी जानरावभाऊ गीरी यांची अविरोध निवड..

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नगर पंचायत राळेगांव च्या आज पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे रविंद्रभाऊ शेराम नगराध्यक्षा पदी तर उपनगराध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाचे जानरावभाऊ गीरी यांची अविरोध निवड झाल्या बद्दल शहरात समाधान व्यक्त केले जात आहे हे विशेष.
नगरपंचायत राळेगांव ची निवडणूक झाली त्यात काँग्रेस ने घवघवीत यश मिळवले आज राळेगाव नगरपंचायत ची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली त्यात अध्यक्ष म्हणून प्रभाक क्रमांक 10 नगर सेवक श्री रवींद्रभाऊ शेराम यांची तसेच प्रभाक क्रमांक 2 नगर सेवक काँगेस पक्षाचे नेते श्री जानरावभाऊ गिरी यांची अविरोध निवड करण्यात.यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्लभाऊ मानकर काँग्रेसचे ओ बी सी सेल चे जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर, तालुका अध्यक्ष अरविंदभाऊ फुटाणे, शहर अध्यक्ष प्रदीपभाऊ ठुणे, तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व नेते पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.