माझी वसुंधरा अभियानात राळेगाव नगर पंचायत जिल्ह्यातुन प्रथम

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्यशासनाच्या वतीने पर्यावरणाच रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाने हाती घेतलेल्या माझी वसुंधरा अभियान २.० या स्पर्धेचा निकाल घोषित झाला. त्या मध्ये राळेगाव नगर पंचायत जिल्हातून प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली.

अमरावती विभागातून नगर पंचायतीने दूसर स्थान पटकावले आहे. राज्य शासनाचा महत्वाकांक्षी माझी वसुंधरा अभियानाच्या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्तिथित जागतिक पर्यावन दिनी ५ जून रोजी जाहीर झाला. त्यामध्ये नगर पंचायत राळेगाव यवतमाळ जिल्ह्यात पहिला क्रमांक, अमरावती विभागात दूसरा व राज्यात ४३ वा क्रमांक आला. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात विविध कामे व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली माझी वसुंधरा अभियान २.० या मध्ये राळेगाव नगर पंचायत सहभागी झालेली होती त्यानुसार शहरात निसर्गाशी निगडीत असलेली कटिबद्धता निच्छित करण्यासाठी पृथ्वी वायु जल अग्नि आकाश या पंचतत्वानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल या सबंधित स्वच्छता विषयक कामे तसेच उपक्रम राबविण्यात आले. राज्यात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगारपरिषद व अमृत शहरे असे गट होते या अभियान मध्ये १३७ नगर पंचायती सहभागी झालेल्या होत्या.