कोरोना चाचणीला खैरी वासियांचा उत्सुर्त प्रतिसाद. स्थानिक प्रशासन अर्लट मोड वर. चार दिवसांचा जनता कर्फ्यु.


तालुका प्रतिनिधी(राळेगांव) :रामभाऊ भोयर


कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज ९ मे रोजी खैरी येथे आरोग्य विभागाकडून नागरिकांची अँटी रॅपिड टेस्ट करण्यात आली.खैरीत गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच जणांच्या मृत्यूने गावात भितीचे वातावरण पसरले असून त्यादृष्टीने स्थानिक प्रशासन देखील अर्लट मोड आल्याचे दिसून येते आहे.सध्या गावात ठिकठिकाणी रेकामटेकड्यांचे टोळके दिसून येत असल्याने पोलिस प्रशासनाने त्यांचा देखील बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

तालुक्यात सर्वात मोठी लोक संख्या असलेल्या खैरी गांवात गेल्या महिनाभरापासून कोरोना आजारासह अज्ञात तापाच्या आजाराने थैमान घातले असून येथील तिनही खाजगी रुग्णालये तुडुंब भरून असल्याचे चित्र नेहमी पहावयास मिळत आहे.तर काही रुग्ण कोरोनाच्या धास्तीने वैद्यकीय उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.अशातच गेल्या दोन दिवसांत पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला.त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून येथील प्रशासन देखील त्यादृष्टीने कामाला लागले आहेत.काल ९ मे रोजी येथील कन्या शाळेत कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १९८ जणांची तपासणी करण्यात आली.यात सात जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून या सातही रुग्णांना राळेगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यास स्थानिक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. या शिबिराला गटविकास अधिकारी रविकांत पवार,मंडळ अधिकारी कणसे, सचिव वरफडे, तलाठी अविनाश पाटील सचिव उमरतकर कृषी अधिकारी विशाल मुलाटे यांनी भेटी दिल्या होत्या.

बाॅक्स…
आज कोरोना समितीची बैठक.
गावातील रुग्ण संख्या आटोक्यात यावी यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.कोरोनाचा संसर्ग होऊ नये तसेच गावात पुढील चार दिवसांचा जनता कर्पू लागु करावा काय ? या विषयावर येथील कोरोना समितीने तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत तहसीलदार रवींद्र कानडजे वडकी चे ठाणेदार विनायक जाधव उपस्थित राहणार असल्याचे
कळते.