राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे गोंडवाना संग्राम शाखेच्या वतीने विर बाबूराव पुलेश्चर शेडमाके यांची १८९ वी जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे गोंडवाना संग्राम शाखेच्या वतीने विर बाबूराव पुलेश्चर शेडमाके यांची १८९ जयंती धानोरा येथे दि. १२ मार्च रोजी साजरी करण्यात आली. यावेळी धानोरा येथे गोंडवाना शाखेचे सर्व सदस्य गण हजर होते..

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राळेगाव तालुका अध्यक्ष मारोतराव शेडमाके, धानोरा शाखा अध्यक्ष भारत परचाके, दत्तुजी जुमनाके,तुळशिराम गेडाम,जिवन जुमनाके, समीर, पंकज, प्रविण, आकाश, राहुल तोडासे,कालिंदा सलाम, कांताबाई येलके, सुनंदा धुर्वे, अनुसया परचाके, विलास साखरकर, व गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.