राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील महिलांची पाण्यासाठी पायपीट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथे मागील एक महिण्यापासून पिण्याचे आणि वापरायचे पाणी मिळत नाही. वेळोवळी याबाबबत ग्रामपंचायतला सांगुनही ग्रामपंचायत प्रशासनाला अजुनही जाग आली नाही. पाण्याची समस्या सांगायला गेले तर ग्रामसेवक आठ, आठ दिवस राहत नाही . गावाच्या सभोताल पाणी असतांना फक्त ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महिलांना पाण्याच्या नियमित मिळावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर जाण्याची वेळ आली आहे. या पाण्याच्या गंभीर समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी आष्टोणा येथील महिलांनी मागणी केली तातडीने पाण्याची समस्या सुटली नाही तर महिला पंचायच समिती वर जावुन आंदोलन करु असा ईशारा देण्यात आला आहे.