
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक आज दिनांक २८/१०/२०२१ रोज गुरूवारला पार पडली,.त्यामध्ये तेलंगे गटाकडून सरपंच पदाकरीता राजेंद्रभाऊ तेलंगे यांचे नाव उपसरपंच गजाननभाऊ झोटींग यांनी सुचवून प्रक्रियेला सुरवात करण्यात आली.या नावाला ग्रामपंचायत सदस्य सौ चंदाताई विजयराव पिंपरे,सौ कल्पनाताई नरेशभाऊ पाल,सौ विद्याताई खुशालभाऊ ठवरी यांचे सहकार्य लाभले. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत राजेंद्रभाऊ वामनराव तेलंगे यांना पाच मते मिळाल्यामुळे त्यांना सरपंच पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. या निवडणूकीकरीता निवडणूक अधिकारी म्हणून एम डी सानप यांनी काम पाहीले.तर ग्राम पंचायत रावेरीचे सचिव प्रविणजी निकोडे यांचे सहकार्य लाभले ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
