शाळा कॉलेज मध्ये बाल संस्कार/वैचारिक उद्बोधन कार्यक्रम घेताना राष्ट्रसंताच्या विचारांचे मुल्य रुजवली पाहिजे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नवभारत अध्यापक विद्यालय मध्ये आयोजित कार्यक्रम ” बाल आनंद मेळावा ” आणि “वैचारिक उद्बोधन” प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनीलजी गावंडे तसेच मुख्याध्यापक श्री रेवचंद भावेकर प्रा मोहण जी वडतकर मा मधुसूदन कोवे गुरुजी मा कृष्णा भोंगाडे उपस्थित होते

वैचारिक उद्बोधन करण्यासाठी सप्तखंजेरी वादक दिपकदादा भांडेकर ग्रामगीता प्रबोधनकार आणि त्यांचा संच उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेश कापसे यांनी केले होते शाळा/कॉलेज मध्ये आता वैचारिक उद्बोधन करताना राष्ट्रसंतांच्या वैचारिक मुल्य सांगीतले पाहिजे आज काळाची गरज आहे

बाल आनंद मेळावा आणि वैचारिक उद्बोधन कार्यक्रमात मान्यवरांच्या विचारातून ग्रामगीता आणि सामाजिक विचारांचे मार्गदर्शन करण्यात आले होते सप्तखंजेरी वादक दिपकदादा भांडेकर ग्रामगीता प्रबोधनकार यांचे सर्व उपस्थित मान्यवरांची कौतुक केले यात प्रशांत नागपूरे मुख्याध्यापक प्रा वंदना बारई सुनील नरांगे यांचं सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अरुणा चरडे यांनी केले आहे.