
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महसूल प्रशासनाचे संदर्भात कोठलेही कामात अडचणी आल्यावर सबंधितांनी वेळ न दवडता मला प्रत्यक्ष भेटावे,प्रश्नाची उकल,समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन कर्तव्यदक्ष तहसिलदार डाँक्टर रविंद्रजी कानडजे यांनी आज संपन्न झालेल्या महसूल दिनी करुन लोकांचे प्रश्न,समस्या मार्गी लागल्याच पाहिजे असे सांगितले. या वेळी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटूंबियांना,जे शासकीय निकषात बसले त्यांना धनादेश देण्यात आले.
अनाथ मुला मुलींना, इतर काही गरजूंना शिधापत्रिका वाटप,तसेच काही तरुणांना मतदान कार्ड देण्यात आले आहे. महसूल प्रशासना मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यां चा सत्कार व प्रशस्तीपत्र नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी,लिपिक,पोलिस पाटील,कोतवाल यांना देण्यात आले आहे. या सर्व बाबी महाराजस्व अभियानात अंतर्भूत असल्याचे सांगितले.
यावेळी नायब तहसिलदार दिलिपराव बदकी,अनिलराव माने,आशिषराव वीर,एन.डी बेंडे .मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन मंडळ अधिकारी महादेव सानप,तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी बाबाराव पोटे यांनी केले. महसूल प्रशासनाचे सर्व कर्मचारी,पत्रकार बंधू,मान्यवर नागरिक यावेळी उपस्थित होते…
