विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त गावा गावात जाऊन ” आदिवासी युवा स्वाभिमान दिवस “साजरा करण्याचं भाग्य मला लाभले- मधुसूदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आज विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त “‘ गावा गावात मार्गदर्शन सभा”‘ घेण्यासाठी राळेगाव तालुक्यात वा॒रा, दापोरी,वालधुर,जागजई,उंदरी अंतरगाव, कोपरी, या गावात जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियानामध्ये आदिवासी समाजातील तरुणांना आणि महिलांना अनेक विषय देवुन मार्गदर्शन करण्यात आले होते

आदिवासी युवा स्वाभिमान दिवस”‘ या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष (महिला) गोंडवाना गणतंत्र पार्टी मा शोभाताई वरखेडे (वंडली) मा.हणुमंत टेकाम ( पाथ्रड )मा.जयश्री मेश्राम तालुका सचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी कळंब मा.विठ्ठलभाऊ धुर्वे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांच्या उपस्थितीत होता.

विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त युवा तरुणांचे शौर्य, देशासाठी बलिदान,हा आदिवासी समाजातील नव तरुणांसाठी स्वाभिमान दिवस आहे म्हणून गावा गावात जाऊन “‘ मार्गदर्शन सभा”‘ आयोजित करुन “‘आदिवासी युवा स्वाभिमान दिवस”‘ साजरा करण्यात आले होते.आता आपल्याला सत्ता संपादन करायची आहे असे जाहीर आवाहन मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांनी केले आहे

या जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या शाखा प्रमुख म्हणून शितल सलाम ( दापोरी ) रेखाताई कन्नाके (जागजई ) कुळसंगे सरपंच ( उंदरी ) सुनिता कुळसंगे (अंतरगाव ) यांच्या नियुक्त्या गावं शाखा प्रमुख म्हणून करण्यात आल्या होत्या “‘गावा गावात मार्गदर्शन सभा”‘ हा जनसंपर्क दौरा यशस्वी करण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक परीश्रम घेऊन अभियान यशस्वी केले होते.