
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कीन्ही जवादे येथे संपन्न झालेल्या शामदादा कोलाम जयंती निमित्त साजर् या झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरभाऊ जवादे सरपंच कीन्ही जवादे उपस्थित होते . त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शासनाने कोलाम समाजाला आदीम जमात म्हणून मान्यता दिली आहे.त्यांची संस्कृती जतन करणे आवश्यक आहे, त्याकरिता कोलामी भाषेत लीखीत साहित्य व स्वतंत्र लिपी आवश्यक आहे, त्याकरिता समाजातील शिक्षीत युवकांनी पुढाकार घ्यावा.स्वच्छता ,निटनेटके राहणीमान हे गुण इतर समाजाने स्वीकारले पाहिजे.
कार्यक्रमास रामदास माणगी,राजु मुंडाली, निळकंठ वडदे,अय्या मेश्राम, देवेंद्र उईके,राजु महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले
