
उपकार्यकारी अभियंता राळेगाव यांचे वडकी वीज महावितरण कंपनी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात वडकी वीज पुरवठा कंपनीच्या लपन डावामुळे शेतकरी शेतमजूर हैराण सविस्तर वृत्त असे अखेरच्या टप्प्यात म्हणजे मे महिन्याच्या शेवटी शेवटी शेतकरी व शेतमजूर यांना वडकी वीज पुरवठा कंपनीच्या लपन डावामुळे मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवसातून पन्नास वेळा गावामधील बत्ती गुल होत असल्याने शेतमजूर यांना दोन तास सुध्दा आराम करायला मिळत नाही. तर शेतकरी यांना गुरेढोरे पाणी पाजण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर या परिसरात ९० टक्के रोहित्रे असलेल्या ठीकाणी पेटी ला एकही झाकण लावून दिसत नाही तर रोहित्राच्या ठीकाणी पेटी मध्ये एकही ग्रीप लावलेली दिसून येत नाही. सदर पेटी मध्ये ग्रीपा नसल्याने एका दिवसातून पन्नास वेळा या परिसरात बत्ती गुल होत असल्याचे दिसून येत आहे. तर वडकी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता हे कुंभकरना सारखे झोपेचे सोग घेऊन असल्याचे शेतकऱ्यांत बोलल्या जात आहे. यांच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून उप कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रण असते परंतु तेही झोपेचे सोग घेत असल्याचे दिसून येत आहे.असे शेतकरी शेतमजूर यांच्या कडून सांगितले जात आहे. वडकी वीज पुरवठा कंपनी अंतर्गत ४० ते ४५ गावे असुन येथे १० ते ११ कर्मचारी कार्यरत आहे. सदर नागपूर ते हैदराबाद रोडवर वडकी हे गाव असुन येथे महावितरण कार्यालयाच्या ऑफिसला वडकी वीज पुरवठा कंपनी असा साधा एक बोर्ड सुद्धा दिसून येत नाही. ग्रामीण भागातील एखाद्या नवीन शेतकरी किंवा शेतमजूर काही कामानिमित्ते ऑफिसमध्ये आला तर त्यांना ऑफिस मिळणे कठीण असते अशी या वीज वितरण कंपनीची अवस्था झाली आहे. तर नेमका पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहे.उन्हाळ्यातच ही अवस्था आहे. तर पावसाळ्यात काय अवस्था राहील? सदर या वडकी वीज वितरण कंपनी अंतर्गत संपूर्ण गावामध्ये लाईनमनची व्यवस्था केली आहे. परंतु त्या लाईनमनला लागणारा पुरेसा साठा म्हणजे ग्रीप, फेस तार , रोहित्रे, रोहित्रावर असलेली पेटी अशा एक ना अनेक बाबी आहे. संबंधित अधिकारी लाईन मनला देत नसल्याकारणाने ग्रामीण भागात हा गोंधळ सुरू आहे.असे येथील काही लाईनमन कडून सांगितले जात आहे.ग्रामीण भागात मात्र काम करत असतांना शेतकरी व शेतमजूर यांचे बोलणे मात्र लाईनमनलाच खावे लागतात हे मात्र तितकेच खरे आहे. याबाबत जिल्हा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वडकी वीज पुरवठा कंपनी कडे लक्ष देऊन रिधोरा परिसरात शेतकरी, शेतमजूर यांना सुरळीतपणे वीज पुरवठा करावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी केली आहे.
