
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस तालुक्यातील रामगाव( डोर्ली )येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची अवैध शेती केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी कारवाई करत संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी रविवारी सायंकाळी उशिरा झालेल्या कारवाईत सुरेश आत्माराम आडे यांच्या शेतातून गांजाचे अवैध पीक जप्त करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली .गांजा पिकाची लागवड हे कापूस आणि तुरीच्या दरम्यान म्हणजेच तूर पिकाच्या दरम्यान करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.अंदाजे किंमत ३ लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी,दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले,सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गट्टे,विजय रत्नपारखी,गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन यांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस उपनिरीक्षक रंधे, एलसीबी पथकाचे कुणाल रुडे, ब्रह्मानंद टाळे, सचिन राऊत,प्रभाकर जाधव चालक अनिल गाडे यांनी कारवाई केली आहे.
