राळेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांचे प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके यांची भेट व रोजगार सेवकांचा प्रश्न विधिमंडळात लक्षवेधी मध्ये मांडणार असे ठोस आश्वासन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती तालुका राळेगाव जि.यवतमाळ यांचे शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करणे या प्रमुख व एकमेव मागणीसाठी आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिनांक ०२/१०/२०२१ रोजी एकदिवसीय लक्षणिक उपोषण सुरू होते,उपोषणाला आमदार प्रा.मा.श्री.डॉ.अशोकराव उईके,राळेगाव पंचायत समितीचे सभापती श्री.प्रशांतभाऊ तायडे,जिल्हा परिषद सदस्य श्री. चित्तरंजनदादा कोल्हे,राळेगाव तहसीलचे नायब तहसीलदार श्री.बदकी साहेब भाजपा शहर प्रमुख श्री.कुणालभाऊ भोयर यांनी भेट दिली यावेळी रोजगार सेवकांशी बोलतांना आमदार साहेबांनी विधानसभेत विधिमंडळात हा रोजगार सेवकांचा मुद्दा लक्षवेधी मध्ये ठेवणार असे ठोस आश्वासन दिले,व आमदार साहेबांनी यावेळी असे सांगितले की तुमच्या रोजगार सेवकांच्या प्रश्नावर कोणीच का बरं बोलत नाही तुम्ही एवढ्या महागाईची काळात अल्पशा मानधनावर काम करता तुमचा प्रश्न मी नक्की होणाऱ्या विधिमंडळात मांडणार व तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार,विध्यमान आमदार साहेबांच्या अश्वासनाने उपोषणाची सांगता करण्यात आली,रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मयुर जुमळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होते तसेच उपाध्यक्ष प्रितम इंगोले,प्रभुदास बावणे,निलेश भगत,प्रविण खेवले,विवेक उंडे,नितेश तिवाडे,प्रितेश खुडसंगे व तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते