
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात रविवारी रात्रीपासुन तर सोमवारी जवळपास सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत धोधो पाऊस पडला ,या आलेल्या पावसाने राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अती भयानक पुरपरिस्थिती निर्माण झाली होती ,अनेक जनतेचे घरे ,काही लोकांच्या घरामध्ये अती पाणी ,तर काहिंच्यां घरातले कोरडे अनाज ,तर अनेकांच्यां गुराच्यां गोठ्यातील चारा वाहुन गेला ,असे अनेकांचे अती नुकसान झाले ,त्याचप्रमाने दापोरी कासार व रोहणी येथील नदीला आलेल्या महापुराने गावाचे अती नुकसान झाले त्यामुळे शासनाच्या वतीने राळेगावातील जनतेला भरीव अशी मदत मिळावी अशी जनतेची मागणी आहे.
धानोरा व दापोरी कासार या गावाची पाहणी करीता शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी ,राळेगाव तहसिलचे तहसीलदार डाॅ. रविंद्र कानडजे ,एस .डि .ओं. शैलेश काळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार ,तालुका आरोग्य अधिकार डाॅ. पाटिल ,वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे, धानोरा मंडळ अधिकारी निनावे, कृषी सहायक धुमाळ,सानप साहेब,तलाठी तीरणकर ,धानोरा तलाठी शिवानी सातवकर ,धानोरा येथील सरपंच दिक्षा मुन ,उपसरपंच विशाल येणोरकर , डाॅ. शामसुंदर गलाट, ग्रामपचायत सदस्य विजय चकोले ,जितेंद्र कहुरके, विलास साखरकर ,राजु डडमल ,प्रितम घिनमीने , अंकित पाटील ,ग्रामपचायत कर्मचारी असख्य नागरीक हजर होते.
