15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळणेबाबत सरपंच संघटनेचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन

o

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक 7 जुलै रोजी गटविकास अधिकारी रविकांत पवार यांना सरपंच संघटना राळेगाव द्वारे निवेदन देण्यात आले.ह्यावेळी सर्व सरपंचांनी निवेदनाद्वारे एकच मागणी केली की जो पर्यंत 15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत डाटा ऑपरेटर चे पैसे आम्ही सरपंच देणार नाही शासन निर्णयानुसार 15 वित्त आयोग चे सर्व पेमेंट पी एफ एम एस प्रणाली प्रमाणे ऑनलाइन करण्यात येत आहे तर ऑपरेटर चे मानधन पण त्याच नियमानुसार का नाही करण्यात येत, तेव्हा आम्ही डाटा ऑपरेटर चे पेमेंट करणार नाही असे निवेदना द्वारे सूचित करण्यात आले निवेदन देतेवेळी राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंच बांधव उपस्थित होते