खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेवर तात्काळ शिक्षक भरती करा (गटशिक्षण अधिकारी राळेगाव यांना मनसेचे निवेदन)

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेमध्ये १ ते ४ वर्ग असून ८० ते ८५ विद्यार्थी शिक्षण घेत असून देखील एकच शिक्षक कार्यरत आहे व त्यांनाच सर्व शासकीय कामकाज पाहावे लागत असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपण याठिकाणी येत्या ७ ते ८ दिवसात आणखी १ किंवा २ शिक्षकांची नेमणूक करावी. अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांच्या हितासाठी ताला ठोको आंदोलन करावे लागेल त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण सर्वस्वी जबाबदार असाल असा इशारा मनसेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी राळेगाव यांना देण्यात.
आला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे,खैरी शाखा अध्यक्ष भारत निंबुळकर, विशाल राऊत, अमोल गाताडे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.