
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील खूप मोठी तहसील आहे या तहसिलमध्ये रोज शाळकरी मुले,मुली तसेच शेतकरी, शेतमजूर हे कामासाठी येतांना दिसतात पण अशातच आज दिनांक तिस रोजी राळेगाव तालुक्यातील धुमक चाचोरा येथील शेतमजूर वामन लेनगुरे हे राळेगाव तहसील कार्यालयात राशन कार्ड बनवण्यासाठी आले असता त्यांनी या लुटारू अर्जनविसानी एक शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर भाडेतत्त्व लिहुन दिंले स्टॅम्प आणि लिहुन देन्याचे चक्क चारशे रुपये घेतले असता सदर व्यक्तीने काही काळ तहसिल मधे येऊन अर्जनविस यांच्या नावाने आरडाओरडा सुरू केला होता काही नागरिकांनी वामन लेनगुरे यांना त्या अर्जनविसाकडे पैसे वापस मागन्याठी पाठविले असता त्या लुटारू अर्जनविसानी शेतकरी वामन लेनगुरे यांना पैसे देन्यात मनाई केली राळेगाव तहसील च्या बाहेर या लोकांनी आपले थैमान मांडले आहे तुम्हाला लवकर एका दिवसात काम करायचे असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात कारण आम्हाला पण समोरच्या व्यक्तीला द्या लागते तेव्हा लवकर काम होते असे बोलल्या जात आहे हे लोक काही तहसिलच्या लोकांना सुद्धा बदनाम करत आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसताना हे लुटारू अर्जनविस तहसील मध्ये चक्रा मारताना दिसतात यांचा हा गोरखधंदा राळेगाव चे तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी हि होनारी लुट थाबवावी व तो अर्जनविस कोन आहे त्याचा शोध घेऊन योग्य ति कार्यवाही करावी अशा लुटारू अर्जनविसांना तहसिल चा दरवाजा कायमस्वरूपी बंद करन्यात यावा.
