
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
न्यु इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सह. संस्था, राळेगाव कडून न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन देशमुख यांना दिनांक 8 जुलै रोजी सेवानिवृत्ती निमित्त भावस्पर्शी निरोप देण्यात आला. यावेळी प्राचार्य मोहन देशमुख हे नुकतेच दिनांक 30 जुन 2022 रोजी शासनाचे नियमानुसार वयाची अट्ठठावन वर्ष पूर्ण झाल्यामुळे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत, त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भावस्पर्शी या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवंनियुक्त प्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू एजुकेक्शन सोसायटीचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब धर्मे , संस्थेच्या सचिव सौ.अर्चना धर्मे , माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे, प्रा. अशोक पिंपरे, , नवनियुक्त उपप्राचार्य विजय कचरे, नवनियुक्त पर्यवेक्षक सुरेश कोवे , शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे, न्यू इंग्लिश पगारदार कर्मचारी संस्थेच्या अध्यक्षा सौं.रेखा कुमरे, उपाध्यक्ष विनोद चिरडे,सचिव किशोर उईके, सामाजिक कार्यकर्ते गणपतजी ताठेवार हे यावेळी मंचावर उपस्थित होते. या वेळी प्राचार्य मोहन देशमुख यांना सेवानिवृत्ती निमित्त तर संस्थेच्या सचिव सौं अर्चना धर्मे यांना नुकतीच मानद डी. लिट.ही पदवी प्राप्त झाल्यामुळे न्यु इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सह. संस्था यांच्या कडून शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या कडून या वेळी प्राचार्य मोहन देशमुख यांना सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ व भेट वस्तू देण्यात आली. यावेळी मोहन देशमुख यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेतील अनेक शिक्षकानी, प्रमुख पाहुण्यांनी तसेच सत्कारमूर्ती यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चिरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद चिरडे यांनी केले. तसेच या भावस्पर्शी निरोप समारंभ कार्यक्रमास संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
