
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
हेद्राबाद कडून नागपूरकडे जात असताना बोरी इचोड गावाजवळ अशोका हॉटेल जवळ रस्त्याच्या मधोमध बंदर आडवा आल्याने बलेनो गाडीची डिव्हायडर ला धडक लागून या अपघातात वाहनचालक हे गंभीर जखमी झाल्याची घटना दि १४ जून २०२२ रोज मंगळवारला सायंकाळी ४ च्या सुमारास घडली आहे.
या झालेल्या अपघातात सुहास फडणीस वय ३७ वर्ष रा नागपूर हे आपल्या बलेनो वाहन क्र एम एच ३१ एफ इ ३८३३ ने हेंद्रबाद वरून नागपुर कडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील बोरी इचोड गावाजवळ असलेल्या अशोका हॉटेलसमोर दोन बंदर रोडच्या मधोमध आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या नादात गाडी चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटून वाहन हे वेगात असल्याने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनाने दोन पलटी घेतल्या हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचे यात मोठे नुकसान झाले असून यामध्ये वाहन चालक हे या अपघातातून सुखरूप बचावले असून त्याला डोक्याला व हातापायाला किरकोळ मार लागला असून त्याला पुढील उपचारास दवाखान्यात पाठविण्यात आले घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तात्काळ दाखल होऊन घटनेचा पुढील तपास करीत आहे.
