ओल्या कापसाला राळेगांवात मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव…सहाशे क्विंटल कापूस खरेदी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने वेचणी स आलेला कापूस ओला गच्च झाल्याने,वाळविण्यासाठी उन्ह नव्हते. या ओल्या कापसाला काय भाव मिळणार याच विवंचनेत शेतकरी बांधव असतांना आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी जिनिंग  जिनिंग प्रेसिंग राळेगांव ने खरेदी सुरु करुन सरसकट पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव दिल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे हे विशेष. आज सहाशे क्विंटल कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी झाली आहे..
महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग राळेगांव चे संचालक नंदकुमारभाऊ गांधी यांनी चांगल्या उच्च दर्जाच्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आपण नगदी स्वरुपात जागेवर देऊ असे शेतकऱ्यां समक्ष जाहिर केले आहे. आज मिळालेला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव हा ओला कापूस बघता साडे सहा ते जवळपास सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव पडल्याची चर्चा व्यापारी बांधवां कडून ऐकावयास मिळत आहे हे विशेष….