किन्ही जवादे येथे विद्यार्थ्यांना मोफत जातीचे दाखले वाटप महसूल विभागाचे महाराजस्व अभियान सन.२०२१/२२ अंतर्गत-मंडळ स्तरावर विविध प्रकारचे दाखले वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

शासकीय आश्रमशाळा कीन्ही जवादे येथे आज महसूल विभागाचे वतीने आयोजित महाराजस्व अभियान अंतर्गत आश्रमशाळा कीन्ही येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत जातीचे प्रमाणपत्र तसेच वनहक्क चे ७/१२ व आश्रमशाळा च्या जमीनीचा मालकीहक्काचा ७/१२ असे विविध प्रकारचे दाखले देण्यात आले.या प्रसंगी उपस्थित .उपविभागीय अधिकारी मा.शैलेश काळे, तहसीलदार मा.कानडजे साहेब, मंडळ अधिकारी सानप साहेब, मुख्याध्यापक कुळसंगे सर, तलाठी सौरभ चांदेकर, तलाठी चीडे, तलाठी देवळे,, सरपंच सुधीर जवादे,रवी ठाकरे, नरेश सावरकर,, सुनील मेश्राम,व आश्रमशाळा कर्मचारी,शिक्षक व्रुंद, विद्यार्थी हजर होते.