
वणी तालुक्यातील सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था. सुकनेगाव ते गोडगाव रस्ता चार किलोमीटर आहे , तरीपन स्वांतञ्याच्या सत्तर वर्षा नंतरही रस्ता मरणयातना भोगत आहे . या रस्त्याची निर्मीती 1975 ते 1980 च्या दरम्यानची आहे तेव्हापासुन कधी या रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही रस्ता तयार झाला तेव्हापासुन अनेक निवडणुका झाल्या अनेक़ लोकप्रतिनीधी निवडुन गेले लोकप्रतिनीधी कधी गावात निवडणुकीच्या प्रचारासाठी गावात येतात तेव्हा त्यांना गावातील नागरिक रस्त्याविषयी माहीती विचारतात तर ते सांगतात कि हो रस्ता होणार आहे होईल त्यानंतर अनेक वर्ष लोटुन जातात आणि पुन्हा विचारल्यास तेच उत्तर राहतात पण रस्ता होत नाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्य सुद्धा याच मार्गावरील आहे पण कोणीही या रस्ताकडे लक्ष द्यायला तयार नाही असे तेथील परिसरातील नागरिकांनी सांगितले यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे कारण वणी हे ठिकाण सुकनेगाव या मार्गाने गेल्यास अठरा किलोमीटर तर कायर या मार्गाने गेल्यास सत्ताविस किलोमीटर पडतात आणि सुकनेगाव ते गोडगाव मार्ग तयार झाल्यास अनेकांचा फेरा कमी होईल व याचा फायदा वणीला शाळा महाविद्यालयात जाणर्या विद्यार्थांना कामानिमित्य जाणार्या नागरिकांना होईल विशेष महत्वाचे म्हणजे याच मार्गावर पुरातन भवानी माता मंदीर इजासन आहे तरी या मंदीरात येणार्यांना सुद्धा या मार्गाचा फायदा होईल
