
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ यांच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. उन्नती संजयराव भोयर हिने झाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत फलोत्पादन पिकांवर बॉर्डो मिश्रणाचे फळांवर असलेले फायदे , त्याचे उपयोग कसे करावे , व मिश्रण कसे तयार करावे याचे महत्त्व शेतकऱ्याला पटवून दिले.यामध्ये तिने बोर्डो मिश्रण म्हणजेच कॉपर सल्फेट आणि line (chuna) याचे योग्य प्रमाण घेऊन ते दोन्ही घटक एका प्लास्टिक च्या बादलीत त्याचे मिश्रण बनवून ते मिश्रण फळाच्या पानांवर फवारणी करून किव्हा त्याच्या फांद्यावर ब्रश चा माध्यमातून लावले अश्यlप्रकरे तिने बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला .
हा उपक्रम डॉ. आर. अ. ठाकरे सर (प्राचार्य) ,श्री . एम. वी. कडू सर (उपप्राचार्य) , श्री शुभम सरप सर ( ग्रामीण कृषि कार्यानुभव अधिकारी) व श्री . के. टी .ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला
या उपक्रमाला प्रगतिशील शेतकरी रूपेश काळे, अविनाश भोयर , प्रतीक भोयर , व इतर सहाय्यक शेतकरी उपस्थित होते.
