
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराया यांच्या जयंती निमित्ताने रिधोरा ग्रामपंचायतच्या वतीने अपंगांना एलइडी बलचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रिधोरा ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून साध्या पध्दतीने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली व अपंगांना गावचे सरपंच प्रथम नागरिक उमेश दामोधरजी गौऊळकार यांच्या हस्ते एलइडी बलचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उमेश गौऊळकार, सचिव वीणा राऊत, ग्रा.प. सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील अपंग उपस्थित होते
