
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय जनता पक्षाची सत्ता ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असून जनतेने विश्वास दाखविल्यामुळेच हे शक्य झाले आहे. तरुणांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे आश्वासन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भाजपा पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित युवकांना दिले.
आमदार समिरभाऊ कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षप्रवेशाच्यावेळी ते बोलत होते.
समुद्रपुर तालुक्यातील गिरड तसेच फरीदपुर येथील असंख्य शिवसैनिकांनी आज दि.९ रोजी आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
याप्रसंगी आमदार समीर भाऊ कुणावार, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर भाऊ दिघे ,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ सहारे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष संजय भाऊ डेहणे ,जिल्हा सचिव सुभाष जी कुंटेवार, समाजसेवक अरुण भाऊ मोटघरे , गिरड येथील सरपंच राजूभाऊ नौकरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यकर्त्यांचा भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
आज शिवसेनेला रामराम करीत भाजपा प्रवेश करणाऱ्या गिरड तसेच फरीदपुर येथील कार्यकर्त्यांमधे सर्वश्री
प्रल्हादराव पोयाम, दयाराम मांडवकर, देवानंद अवधूत, विठ्ठलराव पिंजरकर ,योगेश पिंजरकर , संतोष राव कुटे, महादेवराव तराळे, अजय झाडे, नागेश सोनवणे ,सचिन गिरडे, शरद कावळे, लोकेश मुळे, नितीन झाडे, विकी दडमल ,विपुल डडमल, जगदीश भजभुजे,आशिष ढोणे, शंकर तटे, चिंधुजी सहारे ,गोविंदा शीरगम ,दशरथ बावणे, अतुल भुरे, धनराज जुगनाके, सुभाष सावरकर, सुरेश गायकवाड ,राजू पुणेकर , गजानन वाडेकर, अतुल मुळे, धोंडू भजभुजे ,अरुण नन्नावरे ,हरिभाऊ सावरकर, नानाजी नैताम , बंडूजी परचाके, सर्जेराव कोयचाडे, अमोल मडावी, आत्माराम पेंदाम, बाळू मडावी ,राजू सडमाके , नारायण परचाके, शंकर बटे, तुळशीराम बावणे ,विनायक लाजुरकर, शांताराम डडमल, प्रशांत वांदिले, विशाल डडमल ,राजू भोंगाडे, प्रमोद फाले ,सलाम जी भाई, प्रमोद काळे, रुपेश पोमटकर यांचा समावेश होता.
