शास्त्र शुद्ध फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे शेतकऱ्याची लेक


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


वरुड येथील कृषी कन्ये ने केले युवा पिढीला शास्त्रशुद्ध फवारणीबाबतचे मार्गदर्शन डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा कृषी कन्या श्रेया गजानन निमट या विद्यार्थीनी ने फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच शास्त्रशुद्ध फवारणी कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत प्रात्यक्षिक कार्यक्रमात फवारणी करिता शेतकऱ्यांनी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गढुळ पाण्याचा वापर केल्यास औषधावर विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. तसेच शेतकऱ्यांनी मास्क, चष्मा, रबरी हातमोजे चढवून फवारणी करावी.
फवारणी पंपची टाकी ही लीक नसावी फवारणी करता वेळेस तंबाखू, गुटका व धूम्रपान करू नये, असे मार्गदर्शन केले या सर्व पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या वेळी शेती मध्ये कृषिसेवक मा. पचारे साहेब, शेत मालक श्री.विलासराव निखाडे, कवडूजी मरस्कोल्हे ,दामोधरराव निखाडे, व मजूर वर्ग आदी उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.महेश राठोड सर,कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे , विषय शिक्षक प्रा.वानखेडे , व प्रा.पल्लवी येरगुडे, प्रा. काजल माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.