
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करिता कृषीधन या कंपनीच्या जे एस ३३५ या वाणाची पेरणी केली असून हे कृषीधन कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे. या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई कंपनीने द्यावी अशी तक्रार कृषी कार्यालयाकडे केली आहे.
राळेगाव येथील शेतकरी गजानन बेसेकर यांनी १६ बॅग तर विश्वंभर ठाकरे यांनी ५ बॅग तसेच गजानन पाल यांनी ५ बॅग असे एकूण २६ बॅग कृषिधन कंपनीचे जे एस ३३५ वाणाचे सोयाबीन बियाणे चिंतामणी कृषी केंद्र राळेगाव येथून खरेदी केले आहे त्यानंतर या शेतकऱ्यांनी जे एस ३३५ वाणाची पेरणी केली असता पीक जोमात आले परंतु या आलेल्या सोयाबीनला बुरेल शेंगा असून शेंगातील पोचट दाना व बारीक झाल्याने हे बियाणे जेएस ३३५ नसून ते दुसरे कंपनीचे असावे असे शेतकऱ्याकडून बोलले जात असून या बोगस बियाणे मुळे या शेतकऱ्यांचे जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे मात्र गजानन पाल या शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन पीक अजूनही कापणी केलेले नाही तेव्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सदर कृषीधन कंपनीचे जेएस ३३५ वाणाचे बियाणे आहे किंवा नाही याची चौकशी करून कृषिधन कंपनीवर योग्य ती कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे.
