
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225 )
राळेगाव येथील आगार प्रमुख यवतमाळ येथुन ये जा करतात त्या मुळे तेथील कर्मचारी व कामगार याचे एनेक प्रश्न ऐरणीवर आहेत, T9 रोटेशन या नावाने कामगार यांना नितांत त्रास सहन करावा लागतो,तसेच चालकाच्या माध्यमातून डेपो चालविला जातो राळेगाव आगाराला अधिकृत टीसी सुधा नाही, त्यामुळे गाव खेडात बसच्या फेऱ्या वेळेवर सुटत नाही. प्रवासी याची व सध्या शाळेचे दिवस असल्याने विद्यार्थी यांची सुधा खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे,नविन मशिन टिकीट आगाराला उपलब्ध होवून सुधा अजून गेली पंधरा दिवसापासून वाहकाना दिली गेली नाही. बाहेर डेपोत वाटप झाला आहे असे दिसून येते वाहकास विचारणा केली असता अजून वाटप झाला नाही असे सांगण्यात येते. डेपोला कोणतीही सुविधा सुद्धा दिसून येत नाही, स्वछ पाणी पिण्यासाठी नाही, त्यामुळे कामगार यांच्या आरोग्यास खूप मोठा धोका निर्माण सुद्धा होवू शकतो. तेथे असलेली पाणी फिल्टर नविन मशिन बंद आहे याकडे आगार प्रमुखाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे.
या साठी कायम आगार प्रमुख हवा शासनाचा निर्णय असताना देखील कोणताही कर्मचारी निवासी राहत नाही तो निवासी राहावे जने करुन प्रवासी तथा कामगार याचे हाल होणार नाही.ही प्रवासी व जनतेच्या मागणीकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देवून देश्याचे भविष्य शाळेत शिकणारी विद्यार्थी यांची बस फेऱ्या व्यवस्थित सुरू करून व निवासी आगार प्रमुख देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
